मराठी रंगभूमीने प्रेक्षकांना आणि कलाकारांना नेहमीच भरभरून दिलं आहे. कधी भरभरून हसवलंय तर कधी धीरगंभीर विचारांनी अंतर्मुख होण्यास भाग पाडलं आहे. एवढंच नाही तर विषय सामाजिक असो वा कौटुंबिक, विनोदी असो अथवा राजनैतिक, ते नाटक जिवंतपणे तुमच्या समोर उभं करून तुम्हाला त्याचाच एक भाग असल्याची जाणीव करून दिली आहे. मात्र, रंगभूमीशी जोडलेली ही प्रेक्षकाची नाळ आता कुठेतरी तुटत चालल्याचा भास होत आहे आणि म्हणूनच, आज रंगभूमीला आपली गरज आहे! कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी बहरलेल्या जिवंत रंगमाचाची जागा आता ऑनलाईन streaming ने घेतलेली दिसून येत आहे. Netflix, Prime च्या भाऊगर्दीत नाटकाचा प्रेक्षक कुठेतरी हरवून गेला आहे. म्हणूनच की काय,…
Author: गायत्री देवरुखकर
माननीय श्री. दिलीप सर, प्रयोग मालाड संस्थेद्वारे आयोजित “लेखक एक नाट्यछटा अनेक” या उपक्रमाअंतर्गत मला तुमची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि माझे कितीतरी वर्षांचे तुम्हाला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले. लहानपणी मी तुमचं हसवा फसवी हे नाटक पहिलं आणि मी तुमची “फॅन” नाही म्हणता येणार पण शिष्य किंवा भक्तच झाले. मला नाटक, रंगमंच याबद्दलची ओढ आणि आवड निर्माण होण्यामागे तुम्ही एक मोठं कारण आहात असं मी समजते. तुम्हाला भेटण्या अगोदर तुमच्या बद्दल मनात जी छबी रेखाटली होती ती अगदी तंतोतंत खरी ठरली. तुम्ही स्वतःमध्येच अभिनयाची, सकारात्मक व्यक्तिमत्वाची एक चालती-फिरती कार्यशाळा आहात असं मला नेहमीच वाटत आलं आहे आणि तुम्हाला भेटल्यावर त्याचा…

