Author: गायत्री देवरुखकर

नाट्य, मालिका व सिनेसृष्टीतील तब्बल चाळीस वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये अभिनेता, नाट्य निर्माता आणि दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा बहुगुणी कलाकार म्हणजे विनय आपटे. ७ डिसेंबर, २०१३ रोजी हा गुणी कलाकाराचे दुःखद निधन झाले. १७ जून रोजी विनय आपटे यांची जयंती आहे. हेच औचित्य साधून १७ जून, २०२१ रोजी ‘विनय आपटे प्रतिष्ठान’तर्फे एक ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विजय केंकरे, संजय जाधव, सतीश राजवाडे, सुलेखा तळवलकर, नितीन वैद्य, भरत दाभोळकर अशा दिग्गज कलाकार मंडळींचा या परिसंवादात सहभाग असणार आहे. तसेच, अजित भुरे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. प्रेक्षकांना ‘विनय आपटे प्रतिष्ठान’ च्या फेसबूक पेजवर १७ जून, २०२१ रोजी…

Read More

सत्कर्व मुंबई अयोजित ऑनलाईन नाट्यशिबिर पुन्हा एकदा सुरू होणार आहे. १५ मे, २०२१ रोजी ह्याचे पहिले नाट्यशिबिर झाले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला म्हणूनच पुन्हा एकदा शिबीर राबवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. पहिल्या शिबिराला सचिन गोताड (नेपथ्य व कलादिग्दर्शक),राजेश कोळंबकर (लेखक), सुनील परब (सिनेदिग्दर्शक), राजू वेंगुर्लेकर (नाट्यदिग्दर्शक), भूषण देसाई (प्रकाशयोजना), स्मिता कोळी (वेशभूषा), श्रीनाथ म्हात्रे (संगीत) तसेच सुनील गोडबोले उर्फ अप्पा (अभिनय) ह्यांनी मार्गदर्शन करून सर्व नवोदित कलाकारांना ऊर्जा व प्रेरणा दिली. २० जून ते २८ जून २०२१ यादिवशी संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत पुन्हा एकदा ह्या ऑनलाईन नाट्यशिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण शिबिराची फी रु. १५००/- असणार आहे. फी…

Read More

लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन कलाकारांची भेट घेता येत नसल्याने विजय कदम, गिरीश ओक असे बरेच प्रख्यात रंगकर्मी ऑनलाईन माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले. या यादीमध्ये आता अजून एका ज्येष्ठ रंगकर्मीचे नाव सामील होणार आहे. ते नाव म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे! पुरुषोत्तम बेर्डे त्यांच्या नाटक आणि चित्रपट सृष्टीतील इतक्या वर्षांच्या अनुभव व आठवणींनी समृध्द अशी एक वाद्यसंगीतमय मैफल म्हणजेच ‘पुरुक्रमा’ घेऊन १३ जून, २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पुरुक्रमाचे यापूर्वी नाट्यगृहातही बरेच प्रयोग झाले आहेत. आता घर बसल्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘पुरुक्रमा’मधून पुरुषोत्तम बेर्डे यांना मिळालेली सगळी रक्कम ते नाट्य समूहाच्या निधीला देणार आहेत.…

Read More

श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ऑनलाईन माध्यमातून घेतली जाणार आहे. एकांकिका पाठवण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. १५ जुलै, २०२१ रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे असणार आहेत. नाट्यमंचावरील पडदा सद्ध्या पडलेला असला तरी ही स्पर्धा म्हणजे रंगभूमीच्या भविष्यासाठीची तरतूद समजता येईल. या स्पर्धेतून रंगभूमीला अधिकाधिक सशक्त आणि मनोरंजक एकांकिका मिळतील अशी आशा आपण व्यक्त करू शकतो. त्यामुळे त्वरा करा! तुमच्या लेखणीला धार येऊ द्या. लवकरात लवकर तुमचे लेखन आयोजकांपर्यंत पोहोचवा.

Read More

ठाण्यातील अजेय संस्था दरवर्षी ‘झपूर्झा’ नावाचा कार्यक्रम करत असते. गेल्यावर्षी लॉकडाऊन असून सुद्धा सर्वात पहिल्यांदा झपूर्झा ‘वसुधैव कुटुंबकम’ या थीम अंतर्गत १५ ऑगस्ट, २०२० रोजी ऑनलाईन सादर झाला. या वर्षी अजेय संस्था Mix Media Theater अंतर्गत झपूर्झा ‘हसले मनी चांदणे’ या थीमनुसार रविवार, २७ जून, २०२१ रोजी झपूर्झा होणार आहे. याची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन डॉ. क्षितिज कुलकर्णी यांचे असून निर्माता गौरव संभुस आहेत. झपूर्झाचे हे ९वे गौरवशाली वर्ष. दर वर्षी झपुर्झा नव्या कलाकारांनी, व्यवस्थापनाने, तंत्रज्ञांनी, कल्पनांनी, संहितांनी रीलोड होतो. कल्पना ही माणसाला मिळालेली सुपर पॉवर. ही कल्पना आपल्या प्रत्येकाच्या ओठावर, गालावर हलकं हसू आणतेच आणते. सध्याच्या निराशेच्या वातावरणात हीच…

Read More

सेजल एन्टरटेन्मेंट्स फिल्म्स संस्थेने ‘हास्य जल्लोष’ ही ऑनलाईन एकपात्री विनोदी अभिनय स्पर्धा आयोजित केली आहे. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक, व्यावसाईक ताण तणाव दूर करण्याच्या हेतूने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. https://youtu.be/t5hpQy9Sn5s प्रवेश विनामूल्य विजेत्यांना पुढीप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत.प्रथम : १०००/- आणि E- Certificateद्वितीय : ७००/- आणि E- Certificateतृतीय : ५०० /- आणि E- Certificateप्रेक्षक पसंती ( you tube views ) : ५००/- आणि E- Certificate प्रवेशाची अंतिम तारीख : १५ जून २०२१ स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धेसाठी वयाची मर्यादा नाही.व्हिडीओ जास्तीत जास्त ५ मिनिटांचा असावा.व्हिडीओचा आवाज स्पष्ट असावा.व्हिडीओ मराठी किंवा हिंदी भाषेत असावा.व्हिडीओ कोणत्याही प्रकारे Edit केलेला…

Read More

रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव या संस्थेद्वारे गेले काही दिवस एक अभिनव उपक्रम ऑनलाईन माध्यमातून राबविला जात आहे. या उपक्रमाचे नाव ‘गीत मेरे मनके‘ असे आहे. नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की या कार्यक्रमात संगीताची एक सुरेल मैफिलच रंगणार आहे. पण या उपक्रमात तुम्हाला निव्वळ गाणेच नाही तर त्या गाण्याचे रसग्रहणही ऐकावयास मिळणार आहे.  रसग्रहण म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर गाणे संपूर्णपणे समजून घेणे. गीतकराला गाण्यातून काय सांगायचे आहे म्हणजेच तिची मध्यवर्ती कल्पना, भावना, विचार, नादमाधूर्य, चाल, अलंकार, गाण्याचा प्रकार, सूचकता, विडंबन या साऱ्याचा अभ्यास म्हणजेच रसग्रहण. ही आगळवेगळी संकल्पना महेश सोनवणे यांची आहे. रविवार दिनांक १४ मार्च रोजी या अभिव्यक्ती…

Read More

लॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट संपून नाटकाचा रुपेरी पडदा लवकरच उघडावा अशी प्रार्थना सर्वच रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षक करीत आहेत. काही रंगकर्मींनी मात्र या बिकट परिस्थितीशी दोन हात करत Online माध्यमातून नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा ध्यास घेतलेला आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनय कल्याण संस्थेचे संस्थापक अभिजीत झुंजारराव. अभिजीत झुंजारराव यांनी फक्त एक नाटक नाही तर चार विविध नाटकांचा नाट्य महोत्सव Online माध्यमातून भरवण्याचे आयोजिले आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट्य असे आहे की चार विविध शहरांमधील चार विविध संस्था या महोत्सवासाठी एकत्रित येत आहेत — थिएटर प्रीमियर लीग २०२०. थिएटर प्रीमियर लीग…

Read More

कोरोनाचा फैलाव वाढत गेल्यामुळे प्रत्येक नागरिक घाबरून गेला आहे. प्रत्येकाला आज स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटत आहे. सर्वत्र नैराश्याचे वातावरण असताना आणि हजारो मनःस्ताप असताना लोकांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत ते म्हणजे रंगभूमीवरील कलाकार! कधी प्रशांत दामले, प्रसाद ओक असे दिग्गज रंगकर्मी Facebook च्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी Live गप्पा मारत आहेत. तर कधी शिवानी रांगोळे तिच्या वाचनात आलेल्या कथा व कवितांचं Instagram वर वाचन करत आहे. काहींनी निवड केली आहे ती YouTube माध्यमाची! डॉ. गिरीश ओक यांचे बहारदार चिवित्रांगण डॉ. गिरीश ओक यांनी मात्र YouTube चा मार्ग अवलंबिला आहे. अग्गबाई सासूबाई, जुळून येती रेशीमगाठी अशा विविध कार्यक्रमातून दररोज…

Read More

कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आणि COVID-19 ला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आलं. ह्याच पार्श्वभूीवर आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी Lockdown चा ऐलान केला. शाळा, कॉलेज, कार्यालयं बंद झाली आणि अख्खा देशच स्तब्ध झाला. कोरोनाशी चार हात करण्यासाठी घरी बसून राहणे हा एकच रामबाण उपाय आहे हे आता निश्चित झाले आहे. बरं तुम्ही म्हणाल, हे सगळं तर आम्ही जाणून आहोत यात नवीन काय? नवीन असणार आहे तो म्हणजे या सर्व परिस्थितीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन! Corona, Lockdown, Quarantine सगळं सगळं अगदी खरं आहे. पण या सर्व परिस्थितीची सकारात्मक बाजू बघितलीत तर तुम्हाला जाणवेल की अगदीच १००% सगळं थांबलेलं…

Read More

कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या COVID–19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी कोरोनापासून जनतेचा बचाव करण्यासाठी Lockdown चा ऐलान केला आहे. जनतेचे या संदर्भातील विचार जाणून घेण्यासाठी प्रयोग मालाड संस्था खालील online स्पर्धांचे आयोजन करीत आहे. १. निबंध (लेख) लेखन स्पर्धा → विषय — कोरोना चा सामाजिक संदेश आणि देश व व्यक्ती स्तरावरील आर्थिक व्यवहारांवर होणारा परिणाम २. छायाचित्र स्पर्धा → विषय — कोरोना हॉलिडे काळातील स्तब्ध मुंबईतील सार्वजनिक व नैसर्गिक विहंगम दृश्ये ३. पोस्टर बनवणे स्पर्धा → विषय — कोरोना युद्ध काळातील अपेक्षित मानसिकता या स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या असतील. तुम्ही एक वा एकाहून जास्त स्पर्धेत सहभागी होऊ…

Read More

रंगभूमी म्हटलं की नाटक हे त्याचं हृदय आणि नाटकांची समीक्षणे ही त्याची स्पंदने असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. होय! बरोब्बर ओळखलंत. आम्ही तुमच्यासाठी नाटकाची समीक्षणे घेऊन हजर झालो आहोत. नाटक बघून त्या नाटकाचा भाव समजून स्वत:ला उमगेलला अर्थ, जाणवलेल्या त्रुटी तरुण पिढीच्या माध्यमातून नाट्यसृष्टीपर्यंत पोहोचवायचा आमचा मानस होता आणि आज आम्ही असाच एक युवा लेखक तुमच्या समोर सादर करत आहोत! या लेखकाचं नाव आहे अभिषेक अरविंद महाडिक. अभिषेक, तुझं रंगभूमीच्या टीममध्ये मन:पूर्वक स्वागत! अभिषेकने श्री. भगुभाई मफतलाल पॉलीटेकनिक मध्ये Civil Engineering चा डिप्लोमा केल्यानंतर St. John College of Engineering and Technology मधून Graduation केले. साधारण अडीच वर्षांच्या Work Experience…

Read More