कडेकोट कडेलोट’ हे मुळ ‘अ वुमन अलोन’ या नाटकाचा मराठी अनुवाद आहे. अमोल पाटील यांनी अनुवाद केला आहे. ७० च्या दशकात Franca Rame या इटालियन लेखिकेने लिहिलेलं हे नाटक जगातल्या सर्व वर्गातल्या स्त्रियांच्या व्यक्ती स्वातंत्र्या विषयी भाष्य करतं. त्यामुळे त्याचे वेगवेगळ्या भाषेत प्रयोग होत राहणं आणि ते सर्व वर्गातील स्त्रियांपर्यंत पोहोचत रहाणं गरजेचं वाटून या नाटकाचा अनुवाद करण्याचे ठरविले. हे नाटक स्त्रीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य याविषयी भाष्य करत असले तरी अनुवाद करताना कुठेही आक्रमकता किंवा चळवळीचा अभिनिवेश न ठेवता त्यातील खुमासदार, कॉमेडी पद्धतीने नाट्य पकडण्याचा प्रयत्न यात केलाय.