vanva minimal cover
vanva minimal cover
INcomplete Theatre आणि रंगभूमी.com निर्मित

वणवा

लेखक: दि. बा. मोकाशी (नाट्य रुपांतर: शिवम पंचभाई)  •  दिग्दर्शक: शिवम पंचभाई
5.0

Synopsis

वणवा ही दि. बा. मोकाशी यांच्या ‘वणवा’ या कथासंग्रहातली एक गोष्ट आहे. ही एक रात्री जंगलात लागलेल्या वणव्याची कहाणी आहे. वणवा लागण्यापूर्वीची शांतता, वणवा पेटल्यानंतर जंगलात जनावरांची-माणसांची होणारी धावपळ आणि वणवा विजल्यानंतर जाळून राख झालेल्या जंगलासोबत मनात घर करून बसणारी शांतता! असा एकूण गोष्टीचा आलेख आहे.

एका शांततेकडून दुसऱ्या शांततेपर्यंतचा प्रवास गोष्टीत मांडलेला आहे. कातकरी आदिवासी समाज जो पूर्णपणे जंगलावर अवलंबून असतो त्यांच्या नजरेतून गोष्ट आपल्यापर्यन्त पोहोचते. पर्यावरणाचा होत जाणारा ऱ्हास यावर सुद्धा गोष्टीत भाष्य केलं आहे.

Cast

समृद्धी खडके, रश्मी माळी. प्रज्ञा समर्थ

Crew

  • नेपथ्य:
  • प्रकाश: यश पोतनीस
  • संगीत: पार्थ घासकडबी, इंद्रनील हिरवे
  • वेशभूषा: दीपाली देशमुख
  • निर्माते:
  • सूत्रधार:
  • इतर सदस्य: संगीत संयोजन: चैतन्य बीडकर, शुभंकर भागवत. • निर्मिती व्यवस्थापक: अनघा कुलकर्णी, कौशिक कुलकर्णी. • Publicity Design: शुभम कुलकर्णी.

User Reviews

गोष्ट धगधगत्या वणव्याची, (डोंगरासोबतच माणसाच्या मनाची)

1 year ago

दि. बा. मोकाशी यांच्या कथासंग्रहावर आधारित कथेच रूपांतर आणि दिग्दर्शन शिवम पंचभाई यांनी अगदी कुशलतेने केले आहे. विषय खूप छान नाजूकपणे व लोकांना विचार करायला भाग पाडेल असा मांडला आहे. मराठी आणि काटकरी भाषेचा सुरेख मेळ घालून भाषेचा गोडवा दुप्पट केलाआहे. एकपात्री अभिनयात प्रेक्षकांना खेचून ठेवनं खरच अवघड असतं पण समृद्धी खडके यांनी अभिनया बरोबर भाषेवर पकड धरल्यामुळे नाटक अजून जास्त डोळ्या समोर उभे राहते. ऐका छोट्या वाडीचे रूप फक्त अभिनय आणि शब्दांनी उत्तम पणे उभे केले,पारंपरिक अशा तारपा नृत्याने आणि संगीताने छोट्या वाडीचे मोठे रूप खुलविले,वणव्याचं वर्णन करताना साकारलेल्या व्यक्ति रेखा, प्रकाश योजना आणि संगीत नाटकाची जमेची बाजू आहे. डोंगरावरचा धगधगता वणवा मनातल्या विझलेल्या माणुसकीला जिवंत करून गेला यात काही शंका नाही.

Thank you INcomplete Theatre and रंगभूमी.com 🙏🙏

Roshan Chikhale

No Title

1 year ago

नाटकामध्ये फक्त तीन स्त्री पात्र होती. त्यापैकी दोन स्त्रियांना संवाद नव्हते. मुख्य नायिकेच्या अभिनयाला नृत्याची जोड देणे एवढेच त्यांचे काम होते. नाटकाचा कालावधी 70 मिनिटांचा होता परंतु नाटकातील नायिका समृद्धी खडके हिने अप्रतिम अभिनय या नाटकात दाखवला. तर रश्मी माळी आणि प्रज्ञा समर्थ यांनी तिला अनुरूप अशी साथ दिली. हे नाटक ‘रंगभूमी.com’ यांच्या मदतीने रंगभूमीवर आलेले आहे. कालचा प्रयोग हा दहावा प्रयोग होता. नाटकातील बोलीभाषा ही विदर्भातील कातकरी समाजाची होती. नृत्यप्रकार तारपा हा होता. परंतु भाषा संपूर्ण मराठी नसली तरी नाटक समजण्यास काही अडचण आली नाही. (जसे की ‘वाडा चिरेबंदी नाटक’ समजायला आपल्याला वैदर्भीय भाषा असली तरी काही अडचण येत नाही)

आपल्याला देखील संधी मिळाली तर हे नाटक अवश्य पाहा.

राजेंद्र मंत्री

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

वणवा मराठी नाटक • Marathi Natak Info

Vanva (Forest Fire) Marathi Natak

Vanva is a new Marathi natak produced by INcomplete Theatre and रंगभूमी.com. It is based on a short story by D.B. Mokashi and has been adapted and directed by Shivam Panchbhai. It stars Samruddhi Khadke and Rashmi Mali.

वणवा मराठी नाटक – सादर झालेले प्रयोग

१) २६ ऑक्टोबर – सुदर्शन रंगमंच (पुणे)
२) ९ नोव्हेंबर – केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगाव (मुंबई)
३) १० नोव्हेंबर – आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच, मलाड (मुंबई)
४) २ डिसेंबर – MITAOE (आळंदी)
५) ७ डिसेंबर – सुदर्शन रंगमंच (पुणे)
६) २२ डिसेंबर – यशवंत नाट्य मंदिर (मिनी), माटुंगा (मुंबई)
७) १९ डिसेंबर – झपूर्झा म्युझियम (पुणे)
८) २५ जानेवारी – सुकून कट्टा वाघलवडी (बारामती)
९) २६ जानेवारी – समरचना स्टुडिओ (पुणे)
१०) २ फेब्रुवारी – NCPA (मुंबई)
११) ४ फेब्रुवारी – दैवज्ञ भवन (सातारा)


Mastodon