प्रत्येक गोष्टीचं समाधान २+२=४ इतकं सोपं असतं का? आपण ज्या भवतालात राहतो, वाढतो
आणि घडतो त्याला Jचिमटीत पकडून त्याचं काही एक सूत्र आपण मांडू शकतो का? आणि त्या
सूत्राला ‘हेन्स प्रुव्ह्ड’ म्हणून निश्चित अश्या समाधानापर्यंत खरंच आपण पोहोचू शकतो?
आदल्या पिढीकडे यांची ठाम उत्तरं असतील ही, आजच्या पिढीला ‘हेन्स प्रुव्ह्ड” पेक्षा कदाचित
प्रश्नच जास्त सुंदर वाटतील आणि शक्यता आहेच की उद्याची पिढी या सगळ्याला निरर्थक ठरवून
फाट्यावर सुद्धा मारेल.
मग या स:र्वांमध्ये संवाद शक्यच नाही का? आणि झालाच तर तो संवाद कसा असेल? निश्चित एका
समाधानापjर्यंत पोहोचण्याची पूर्वअट घेऊन आलेल्या संवादाने आपल्या हाताशी काही लागणार
आहे?
बिनशर्त संवादाने नक्कीच आपल्या हाताशी काहीतरी लागणार आहे. ते काय आहे हे शोधण्याची
ही धडपड. संवादातच समाधानापर्यंत नेण्याचा मार्ग दडलेला आहे. संवादातच आपल्या भवतालाचे
विचित्र सूत्र चित्रमय करण्याचे बळ आहे. या बळाची अनुभूती करून देण्याचा हा प्रामाणिक
प्रयत्न.