सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेण्यासाठी अंगणात बसलेल्या गोदाआजीला तिच्या नातवानं, सुजीतनं फोन आणून दिला आणि फोनवरचं बोलणं ऐकून आजीनं ‘ माझा म्हादू..’ म्हणून मोठ्यानं हंबरडाच फोडला.तिच्या आवाजानं तिची मुलगी वनिता आणि सून सुनंदा हातातलं काम टाकून अंगणात पळत आल्या.शेजारीपाजारीपण तिथं जमा झाले.”सासूबाई, काय झालं?” सुनंदानं भांबावून विचारलं.”आता कसं आणि काय सांगू? माझा म्हादू गेला…” गोदाआजीनं सूर लावला.”काय ss ? माझा म्हादू दादा….असा कसा गं गेला?” वनितानं तिच्या सुरत सूर मिसळला.”ते विचारायचं राहून गेलं की बग…माझा भाचा म्हादू ..बॅरिस्टर होता की…असा कसा गेला.” आजीला धीर देण्यासाठी दोन-तीन बायका तिला खाली बसवून तिची पाठ थोपटू लागल्या.”बॅरिस्टर कुठं?म्हादू काका तर शिपाई होता ना?…
Author: रंगभूमी.com
सोलापूरच्या रंगभूमीला सत्तर वर्षाची परंपरा आहे. सोलापूर हे गिरणगाव म्हणून ख्यातकीर्त असले तरी कलेची रुजवण येथे अमाप होती. शंभर वर्षापूर्वी मेकॅनिकी थियेटर व नूतन संगीत थियेटर या नावाची नाटकासाठी बांधलेली दोन सभागृहे येथे होती. नाटकाचा अर्थात संगीत नाटक व गद्य नाटकाचा खास एक प्रेक्षकवर्ग त्या काळी होता. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक मंडळी, आनंद विकास मंडळी, शाहू नगरवासी या व्यावसायिक नाट्य संस्थांचे प्रयोग तेथे होत असत. तसेच आचार्य अत्रे, मामा वरेरकर, मो.ग. रांगणेकर यांचे नाट्य प्रयोगही हौशी रंगभूमीवर होत होते. प्रत्यक्ष रंगमंचावर सोलापूरातील काही कलाकार मंडळी एकत्र येऊन नाटकांचे प्रयोग करत होते. १९४० च्या दरम्यान नवयुग नाट्य मंडळ, दत्त…
नव्यानेच सुरू झालेल्या २०२० साली कोरोना या जागतिक महामारीची एकच अशी लाट आली की तिने अख्ख्या जगाला हादरवून सोडले. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नसताना आजही हा महाराक्षस गरीब जनतेचे बळी घेतच सुटला आहे. काल या जागतिक महामारीला बळी पडलेला बहुगुणी कलाकार म्हणजे ज्येष्ठ मराठी लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, अभिनेता, कादंबरीकार श्री. रत्नाकर मतकरी! काल दिनांक १७ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमाराला रत्नाकर मतकरी यांचे देहावसान झाले. गेले काही दिवस त्यांना अशक्तपणा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेक अप साठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटीव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात…
आपला भारत देश अनेक अष्टपैलू रत्नांची खाण आहे असे म्हटले तर मराठी रंगभूमीसुद्धा अशा अनेक नाट्यकलावंतांनी भरलेली नानाविध रत्नांची खाण आहे, म्हटले तर वावगे ठरू नये. दिवसागणिक समृद्ध होत जाणाऱ्या मराठी रंगभूमीला सत्तरच्या दशकात असाच एक चमचमता हिरा सापडला. तो हिरा म्हणजे रीमा लागू! सिद्धहस्त लेख, नाटककार कै. वसंत कानेटकर यांचे नाटक लेकुरे उदंड झाली यात त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली. १९६० च्या दशकातील ते नाटक. त्यावेळी त्या आपलं शालेय शिक्षण नुकतंच पुरं करत होत्या. पुण्यातील हुजूरपागा शाळेतून शिक्षण घेत असतानाच रीमा लागू यांनी अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. १९५८ मध्ये भडभडे कुटुंबात जन्मलेल्या रीमाताईंना अभिनयाचं बाळकडू त्यांच्या आई…
काही दिवसांपूर्वीच आम्ही “साहित्य सहवास” या नवीन सदराशी तुमचा परिचय करून दिला. या सदराला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. साहित्य सहवास या सदारांतर्गत आमच्यापर्यंत पोहोचलेल्या विविध कथा आणि लेख आम्ही तुमच्यापर्यंत वेबसाईटद्वारे तर पोहोचवणार आहोतच. पण आज एका नव्या उपक्रमाशी तुमची भेट करून देताना आम्हाला खूप हर्ष होत आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं रंगभूमी.com Podcast मध्ये स्वागत आहे! Podcast म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर श्रुतिका! आता तुम्ही कुठेही आणि कधीही विविध कथा, लेख, कविता रंगभूमी.com Podcast च्या माध्यमातून ऐकू शकता. तुमच्यातीलच कित्येक वाचकांनी आणि रंगभूमी.com च्या टीममधील सदस्यांनी लिहिलेले वेगवेगळे लेख आणि कथा तुम्ही येथे ऐकू…
शनिवारच्या सायंकाळी ज्येष्ठ कलावंतांच्या जोडीने काही विशेष लेख घर बसल्या ऐकायला मिळणं प्रेक्षकांसाठी खुशखबरच! त्यातही महेश एलकुंचवार, चंद्रकांत कुलकर्णी, सचिन खेडेकर अशी दिग्गज नावे असली तर त्याहून अधिक चांगले काही असूच शकत नाही. आज १६ मे, संध्याकाळी ७.३० वाजता, Wide Wings Media च्या Facebook Page वर सादर होणार आहे Wide Wings Media आणि आविष्कार संयोजित अभिवाचन “मौनराग” लेखक – महेश एलकुंचवार दिग्दर्शक – चंद्रकांत कुलकर्णी संकल्पना – पौर्णिमा मनोहर अभिवाचन – सचिन खेडेकर , चंद्रकांत कुलकर्णी आविष्कार संस्थेतर्फे चंद्रकांत कुलकर्णी आणि सचिन खेडेकर गेली १० वर्षे ‘’ मौनराग ‘’…
साहित्याच्या खजिन्यात थोडंसं जरी डोकावून बघितलं तरी ते साधकाला भरभरूनच देतं आणि हे गणित ज्याला गवसलं तो या खजिन्याचा स्वत:ला समृद्ध करण्यासाठी सुयोग्य वापर करून घेतो. असंच काहीसं घडलंय हौशी कलाकार श्री. अनिरुद्ध पाटील यांच्याबरोबर! म्हणूनच की काय त्यांनी कुटुंबिय आणि मित्रांबरोबर हा Online साहित्य मेळावा भरवण्याचे ठरविले आहे. श्री. अनिरुद्ध पाटील यांनी हौशी रंगभूमीवर बऱ्याच नाटकात काम केले आहे. त्यांनी ठरविलेला हा ३ दिवसांचा कार्यक्रम Instagram वर सादर होणार आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे असणार आहे. १५ मे, २०२० – कथावाचन । “प्रकृती” – मधू तथा एम्. पी. पाटील१६ मे, २०२० – काव्यवाचन । कवी – कुसुमाग्रज, पु. शि.…
त्याला भेटण्याच्या ओढीने मी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडी आधीच येऊन कॉफी शॉपच्या समोरच्या झाडाखाली थांबले होते. तसाच असेल का तो? शाळेतल्यासारखा? किती वर्षांनी भेटतोय आम्ही आज. शाळेत अल्लडपणे पाहिलेली स्वप्नं आज परत सत्यात रूपांतरित होतील असं वाटतंय. अजूनही मात्र त्याचा भाव खाण्याचा स्वभाव काही बदलला नाही. इतके दिवस ‘भेटूया’ म्हणून मीच त्याच्या मागे लागले होते. शाळेत असताना माझं त्याच्यावर प्रेम होतं… आणि त्याचंही होतंच माझ्यावर. मला जाणवायचं ते, त्याच्या नजरेतून. तेव्हा सगळं बोलायचं राहून गेलं. आता मात्र मी व्यक्त होणार, मी ठरवूनच आले होते. हा सगळा विचार मनात चालू असताना माझ्यासमोर एक कार येऊन थांबलेली मला कळलंच नाही.”हॅलो मीनल!” काच उघडून आतल्या…
कोरोनारूपी महामारीने संपूर्ण जग त्रस्त असताना या महामारीतून सुटका करण्यासाठी सगळ्यांनी घरी रहाणेच हिताचे आहे हे लक्षात आल्यावर आपले पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनाही भारतात Lockdown पुकारावा लागला. काही कर्मचाऱ्यांकडे घरी बसून काम करण्याचा पर्याय उपलब्ध होता. पण, या Lockdown मध्ये खऱ्या अर्थाने होरपळून निघाली ती म्हणजे रंगभूमी आणि तिच्याशी जोडलेले विविध लोक! रंगभूमीचा पडदा काही काळासाठी पडल्यामुळे रंगभूमीशी निगडित लहान मोठे कलाकार, बॅकस्टेजची माणसं, रंगभूषाकार, सफाई कामगार असे सारेच या अचानक आलेल्या संकटात भरडून निघाले आहेत. अशा वेळी या सर्व निराधार लोकांना मदत करण्यासाठी बरेच कलाकार उभे राहिले. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि भद्रकाली प्रोडक्शन्सचे सर्वेसर्वा श्री.…
खळखळ आवाज करत निसर्गाच्या सौन्दर्यात भर टाकत वाहणाऱ्या मुळा नदीच्या काठावर हिरव्यागार झाडांनी नटलेलं बारशिंग नावाचं गाव होतं. अगदी नावाप्रमाणेच १२ वाड्यांचे मिळून ते एक गाव बनले होते. नुकताच शासनाचा निधी मंजूर झाल्याकारणाने गावात रस्ते बांधणीच काम सुरु होतं. ते रस्ते साहजिकच शहराच्या रस्त्यांना जोडले जाणार होते. रस्त्यांचं काम जोरदार चालू होतं. गावच्या तिठ्यावर कामाच्या शोधासाठी बसणाऱ्या आदिवासींसाठी ही चांगली संधी होती. बिचाऱ्यांचं हातावर पोट म्हणावं अशीच त्यांची अवस्था. जेव्हा काम करून हातात पैसे येतील तेव्हाच बिचाऱ्यांची भूक भागत असे. आणि रस्ते बांधणीसाठी त्या आदिवासी लोकांना बोलावण्यात आलं. चांगलं १५ दिवसांचं काम असल्याकारणाने तीही लोकं आपला बोरिया बिस्तर घेऊन गावात…
१ मे २०२० रोजी रंगभूमी.com आयोजित Online एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्येच आम्ही विशेष लक्षवेधी स्पर्धक या पारितोषिकाचीही घोषणा केली. या पारितोषिकासाठी स्पर्धकांना त्यांच्या सादरीकरणाच्या व्हिडिओवर, रंगभूमी.com च्या YouTube चॅनेलवर आणि रंगभूमी.com च्या Facebook पेजवर प्रेक्षकांचे जास्तीत जास्त एकूण Views मिळवायचे होते. प्रेक्षकांचे जास्तीत जास्त Views मिळवण्यासाठी स्पर्धकांकडे २ मे २०२० दुपारी १२ वाजल्यापासून ९ मे २०२० दुपारी १२ वाजेपर्यंत अवधी होता. मला हे सांगावं लागेल की आठवडाभर खूपच अटीतटीचा सामना झालेला आहे. आज दुपारी १२ वाजता मोजलेल्या Views च्या आकड्यानुसार जास्तीत जास्त Views मिळलेले पहिले सहा स्पर्धक पुढीलप्रमाणे आहेत. विरीशा नाईक – ९०९श्यामसुंदर शहाणे…
आपल्याला आयुष्यात चांगले वाईट असे बरेच अनुभव येतात. त्यामधले काही हलके फुलके अनुभवही कधीकधी आपल्याला आयुष्यभरासाठी काहीतरी बोध आणि गोड़ आठवणी देऊन जातात. असेच काही रंजक अनुभव YouTube च्या माध्यमातून आपल्यासोबत वाटायला सज्ज झाले आहेत आपले लाडके अभिनेते श्री. विजय कदम. नाट्यसृष्टी ते सिनेसृष्टीपर्यंत स्वतःच्या अनोख्या शैलीत प्रेक्षकांची मने जिंकत आलेला हा बहुगुणी कलाकार आता Youtube द्वारे “कदमखोल” या कार्यक्रमांतर्गत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येथे क्लिक करून तुम्ही कदमखोलचे सर्व एपिसोड पाहू शकता. या कार्यक्रमाचे तीन एपिसोड आजपर्यंत प्रकाशित झाले आहेत. दर दोन दिवसांनी या कार्यक्रमाचा एक नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कदमखोल हा कार्यक्रम म्हणजे विजय कदम यांच्या…
![महादू गेला [मराठी विनोदी कथा] mahadeo gela](https://i0.wp.com/myrangabhoomi.com/wp-content/uploads/2020/05/khari-godaa-aaji.jpg?fit=1536%2C950&ssl=1)






![मी आणि तो [मराठी कथा]](https://i0.wp.com/myrangabhoomi.com/wp-content/uploads/2020/05/mojor-zhu-d3fKsX15e7g-unsplash.jpg?fit=1536%2C930&ssl=1)

![आई: रेडलाईट एरिआ [मराठी कथा] Aai redlight area](https://i0.wp.com/myrangabhoomi.com/wp-content/uploads/2020/05/bar-sign-mother-baby.png?fit=1536%2C864&ssl=1)

