लेखकाच्या लेखणीतून उमटलेल्या एका प्रश्नातून अख्या नाटकाचा सार कळतो, “या देशात गरीब कोण? जो कागदपत्रे दाखवून गरीब असल्याचे मांडत राहतो तो, की ज्याची नोंदच झाली नाही तो गरीब?”
शिकार करणाऱ्या फासेपारधी जमातीतील पुंगळ्या या तरुणाच्या अस्तित्वाची कागदोपत्री नोंदच झालेली नाही. त्याच्या जाळ्यात मनुष्याने कधीही न पाहिलेला एक रहस्यमय पक्षी अडकतो. अस्तित्वात असूनही कायम अदृश्य असणाऱ्या दोन जीवांची ही अद्भुत गोष्ट आहे.