५ नोव्हेंबर, २०२१ रोजी पाडवा व मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून जिगिषा अष्टविनायक निर्मित ‘संज्या छाया’ या नाटकाची घोषणा करण्यात आली होती. घोषणा करताना या नाटकाचे लेखक प्रशांत दळवी असून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रशांत दळवी यांचे लेखन आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन म्हणजे दर्जेदार नाटकाची १००% हमी!
लॉकडाऊननंतर या नाटकाची घोषणा झाल्यावर नाटकातील कलाकारांची नावे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. आजच, या नाटकातील कलाकारांची नावे अनोख्या अंदाजात जाहीर करण्यात आली आहेत.
विनोदी अभिनयाचं ‘वैभव’ जपणारा वैभव मांगले आणि विनोद ‘निर्मिती’ च्या कक्षा रुंदावणारी निर्मिती सावंत यांची ‘भन्नाट’ जोडी साकारणार… ‘संज्या छाया’
या घोषणेवरून आपण असा अंदाज बांधू शकतो की हे एक धमाल विनोदी नाटक असणार आहे. कलाकारांची नावे वाचल्यावर प्रेक्षकांची नाटकाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढणार आहे याबद्दल शंकाच नाही.
लवकरच रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या ‘संज्या छाया’ नाटकाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा!
Sanjya Chhaya Upcoming Shows
[tribe_events_list venue=”yes” address=”yes” city=”yes” tags=”sanjyaa-chhaayaa-marathi-natak-shows”]


![संज्या छाया [Review] — आयुष्याचा नवा अर्थ उलगडून देणारा भावनिक प्रवास! संज्या छाया मराठी नाटक](https://myrangabhoomi.com/wp-content/uploads/2021/12/sanjyaa-chhaaya-marathi-natak-1067x600.jpg)
![हरवलेल्या पत्त्यांचा बंगला [Review] हरवलेल्या पत्त्यांचा बंगला](https://myrangabhoomi.com/wp-content/uploads/2020/04/78086063_119292366211742_1598817566099243008_o-1200x467.jpg)