मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट आली असतानाच, प्रेक्षकांसाठी एक सुखद धक्का देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या नाटकाची जोरदार चर्चा सुरू होती, अखेर त्या नाटकाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आणि दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक तब्बल ३० वर्षांनंतर एकाच नाटकात एकत्र येत असून, या नाटकाचे नाव आहे ‘आता थांबवायचं कसं? (Sukanya Mone & Dr. Girish Oak New Marathi Natak Name)’
AMARDIP + कल्पकला आणि सृजन थिएटर्स निर्मित, रसिकराज प्रकाशित
आता थांबवायचं कसं?
लेखन-दिग्दर्शन:संदीप दंडवते
‘कुसुम मनोहर लेले’ मधील त्रिकूट मुहूर्ताच्या निमित्ताने आले एकत्र!
या नाटकाच्या मुहूर्ताच्या वेळी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. ३० वर्षांपूर्वी ‘कुसुम मनोहर लेले’ या अजरामर नाटकातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे सुकन्या मोने, डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने हे त्रिकूट अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रवींद्र नाट्य मंदिरात पुन्हा एकत्र दिसले. संजय मोने यांच्या हस्ते नाटकाचा मुहुर्त करण्यात आला.
५ दिग्गज निर्मात्यांची खंबीर साथ!
केवळ कलाकारच नाही, तर या नाटकाची निर्मिती बाजूही अत्यंत भक्कम आहे. मराठी रंगभूमीला ‘बोलविता धनी’ सारखी यशस्वी कलाकृती देणाऱ्या या ५ निर्मात्यांनी या नाटकासाठीही हातमिळवणी केली आहे.
- प्रवीण भोसले
- भरत नारायणदास ठक्कर
- समृद्धी तांबे
- गंधाली कुलकर्णी
- सुनंदा काळुसकर
या पाचही ताकदीच्या निर्मात्यांमुळे नाटकाची निर्मितीमूल्ये अत्यंत दर्जेदार असणार याची खात्री रसिक प्रेक्षक नक्कीच बाळगू शकतात.
तगडी स्टारकास्ट!

‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकात केवळ सुकन्या मोने आणि गिरीश ओकच नाहीत, तर इतरही नावाजलेले कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात जान्हवी पणशीकर, आकाश पाटील आणि ऐश्वर्या शेटे यांच्याही प्रमुख भूमिका असून, अभिनयाची मोठी जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक आहेत संदिप दंडवते. दीपक गोडबोले नाटकाचे सूत्रधार आहेत. नाटकाचं नेपथ्य साकारणार आहेत संदेश बेंद्रे!
या नाटकाचे प्रयोग लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होतील. या नाटकाबद्दलच्या पुढील अपडेट्स साठी @myrangabhoomi च्या Instagram, Facebook आणि YouTube ला नक्की फॉलो करा.
- Follow us on Instagram: @myrangabhoomi
- Follow us on Facebook: @myrangabhoomi
- Follow us on YouTube: @myrangabhoomi
- Follow our WhatsApp Channel
३० वर्षांनंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक यांना पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. प्रश्न एकच आहे, या उत्सुकतेला आणि आतुरतेला ‘आता थांबवायचं कसं?’

![अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस: न संपणारं युद्ध पर्व…!! [प्रेक्षक प्रतिक्रिया] alexander via diogenes • entry tickets](https://myrangabhoomi.com/wp-content/uploads/2026/06/alexander-via-diogenes-cover-450x253.jpg)

