नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार, रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘दादा, एक गुड न्यूज आहे‘ या नाटकातून ऋता दुर्गुळे या अभिनेत्रीने एक्झिट घेतलेली आहे. ऋताच्या या एक्झिटमागचं कारण अद्याप उघडकीस आलेलं नाही. परंतु, नुकतीच लग्नबंधनात अडकलेली ऋता तिच्या चित्रपटांच्या प्रोमोशनमुळे हा निर्णय घेत असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे. ऋताचा हा permanent ब्रेक आहे की temporary… हा खुलासाही अद्याप झालेला नाही. काही दिवसात सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. त्यामुळे आमच्यासोबत राहा.
Hruta leaves ‘Dada, Ek Good News Aahe’ Marathi Natak
ऋता दुर्गुळे हिचे टाईमपास ३ आणि अनन्या असे २ चित्रपट सध्या प्रदर्शित व्हायच्या मार्गावर आहेत. या दोन्ही चित्रपटांची सर्वत्र जाहिरातही सुरू असल्याचं दिसून येतंय. या धावपळीतच नाटकातून ऋताने काही काळासाठी ब्रेक घेतला असल्याचं दिसून येतंय. यापूर्वी ‘दादा एक गुड न्यूज आहे!’ नाटकातील बॉबी हे पात्र साकारणाऱ्या ऋषी मनोहर या अभिनेत्याने त्याच्या पुढील शिक्षणासाठी या नाटकातून काही काळासाठी विश्रांती घेतली होती. त्याच्या जागी आशुतोष गोखले या कलाकार आज हि भूमिका साकारताना दिसतो.
Who will replace Hruta Durgule on ‘Dada, Ek Good News Aahe’ Marathi Natak?
आता प्रश्न असा उभा राहतो की, ऋताच्या जागी ही भूमिका कोण साकारेल? ‘मन्या’च्या रोलमध्ये खट्याळ लाडकी धाकटी बहीण प्रेक्षकांचं अगदी पहिल्या सीनपासून मन जिंकून जाते. अशी ही लाडकी बहीण आता साकारणार आहे मृगा बोडस. या अभिनेत्रीला तुम्ही याआधी ‘धनंजय माने इथे राहतात’ या नाटकातही बघितलं असेल. तिचा त्या नाटकातील अभिनय व आत्मविश्वास बघून दिग्दर्शकाने योग्य निर्णय घेतला आहे असंच वाटतंय. पण तरीही प्रेक्षकांचा कौल महत्वाचा! मृगा बोडस ही अभिनेत्री या बहुचर्चित नाटकात काय नवी रंगत आणते हे बघण्यासारखे असेल.


नाटकाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील व्हिडिओला भेट द्या.

Upcoming Shows of Dada, Ek Good News Aahe
[tribe_events_list venue=”yes” address=”yes” city=”yes” tags=”dada-ek-good-news-aahe-marathi-natak-shows”]



