alexander via diogenes • entry tickets
alexander via diogenes • entry tickets
Maanoos फाऊंडेशन निर्मित…

Alexander via Diogenes

लेखक-दिग्दर्शक: डॉ. सोमनाथ सोनवलकर

5.0

Synopsis

जग जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने पेटलेला अलेक्झांडर आणि स्वतःला जिंकण्याचा मार्ग निवडणारा डायोजेनिस — या दोन टोकांच्या व्यक्तिमत्त्वांचा विचारप्रवर्तक संघर्ष म्हणजे “अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस”.

सत्ता, युद्ध, विजय, स्वातंत्र्य आणि मानवी अस्तित्वाच्या अर्थाचा शोध घेताना हे नाटक प्रेक्षकांना एका चिंतनशील प्रवासावर घेऊन जाते. एका बाजूला विस्ताराची भूक असलेला सम्राट, तर दुसऱ्या बाजूला सर्व भौतिक गोष्टींचा त्याग केलेला तत्त्वज्ञ.

अलेक्झांडर आणि डायोजेनिस यांच्या ऐतिहासिक भेटीच्या निमित्ताने माणसाच्या अंतर्मनातील युद्ध, विजय आणि पराभवाचा वेध घेणारं एक प्रयोगशील नाट्यअनुभव.

“अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस” — न संपणारं युद्ध पर्व…!!

Cast

अरुण राधायण, डॉ. सोमनाथ सोनवलकर, विनय कांबळे, ग्रेगरी फर्नांडिस.

Crew

  • नेपथ्य: अरुण राधायण
  • प्रकाश: श्याम चव्हाण
  • संगीत: महेंद्र मांजरेकर
  • वेशभूषा: ग्रेगरी फर्नांडिस
  • निर्माते:
  • सूत्रधार: प्रथमेश सावंत
  • इतर सदस्य: रंगभूषा: उलेश खंदारे • रंगमंच व्यवस्था : कुणाल निकम, हर्षदा केणी, आर्यन हर्चेकर, मंदार गायकवाड, राजेश गावडे, पुष्पलता हातनकर, पूजा डेरे, प्रतीक्षा बाणे • व्यवस्थापक: मयुरी तांबडे, चिंतू वालकर • विशेष आभार: गणेश मांडवे, संपदा सोनटक्के • प्रकाशचित्रण: संजय पेठे

User Reviews

No Title

2 months ago

What a wonderful and thought-provoking Marathi play. The performances and dialogues were engaging, and the team’s hard work was evident throughout. A memorable experience and a great contribution to Marathi theatre.

“खरंच, नाटक पाहताना मन भारावून गेलं. उत्तम सादरीकरण!”

Vidhi

सत्ता विरुद्ध साधेपणा

3 months ago

Alexander via Diogenes हे सुंदर आणि विचारप्रवर्तक नाटक आहे. अभिनय, संवाद आणि सादरीकरण उत्तम. खूप आवडलं.

Akhil

विचार करायला लावणारे नाटक

3 months ago

डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित “अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस” हा दीर्घांक फक्त ऐतिहासिक संदर्भावर आधारलेले नाटक नाही, तर ते मानवी अस्तित्व, सत्ता, अहंकार आणि सत्य यावर प्रकाश टाकणारे एक वैचारिक नाटक आहे. सम्राट अलेक्झांडर आणि विद्रोही तत्त्वज्ञ डायोजेनिस यांच्यातील काल्पनिक भेट आणि त्यातून निर्माण झालेला संवाद आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो की माणसाला सगळं काही मिळून देखील तो अपूर्णच राहतो आपल्या मनाला शांतता मिळतच नाही . पण काहीही नसतानाही आपण कसे पूर्ण राहू शकतो शांत राहू शकतो मनाला शांतता कशी मिळते हे दिसून येत

आपल्याला यश किवा आपला विजय तेव्हाच होईल जेव्हा आपण आपल्या मनावर आणि अहंकारावर विजय मिळवला असेल .

नाट्यगृहात विचार करायला लावणारे नाटक आहे . लिखाण, अभिनय , लाइट्स, संगीत , नेपथ्य उत्कृष्ट.

सर्वानी हे नाटक आवर्जून बघा.

Rajesh

!!! अप्रतिम नाटक !!!

3 months ago

गेल्या दशकाभरात महाराष्ट्र हौशी नाट्य स्पर्धेत ज्यांची नाटकं गाजतात असे Great “डाॅ. सोमनाथ सोनवलकर” हे आपलं नवीन नाटक “Alexander Via Diogenes” घेऊन आले आहेत. त्यांच्या इतर नाटकाप्रमानेच ह्याही नाटकात त्यांचे उत्तम लेखन पाहयला मिळते. उत्कृष्ट अशी वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य, आणि प्रकाशयोजना यामुळे त्यावेळचा काळ प्रत्येकक्षात रंगमंचावर उतरल्याचा भास होतो. सर्व कलाकारांनी छान अभिनय केला आहे. खासकरून “अरुण कदम” यांनी Diogenes चे पात्र अप्रतिम साकारले आहे, जणू खरा Diogenes असाच असावा असेच वाटून राहते‌. बाकी पार्श्वसंगीत ही त्या काळाचे वातावरण तयार करण्यास पूरक आहे. ही गोष्ट जरी शेकडो वर्षे जुनी असली तरी आजच्या काळाशी कशी साधर्म्य दर्शवते हे आपल्याला या नाटकातून दिसून येते. ह्या नाटकाला प्रायोगिक नाटकांचे प्रसिद्ध दिग्दर्शक/अभिनेते “अतुल पेठे” यांनी गौरविले आहे. तरी मी सर्व नाट्यरसिकांना आवाहन करतो की आपण हे नाटक जरूर पाहावे आणि आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात.

ह्या नाटकाच्या सर्व संघाचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील सर्व प्रयोगास शुभेच्छा 💐

– सुनिल कांबळे

Sunil Kamble

Brilliant experimental drama ... Must watch

3 months ago

Alexander via Diogenes— विचारांना अस्वस्थ करणारा रंगप्रवास

आजच्या काळात रंगभूमीवर मनोरंजनापलीकडे जाऊन प्रेक्षकांना स्वतःच्या मूल्यांविषयी प्रश्न विचारायला भाग पाडणारी नाटकं फार कमी पाहायला मिळतात. “Alexander via Diogenes हे त्यापैकी एक प्रभावी नाटक आहे. सत्ता आणि स्वातंत्र्य, विजय आणि वैराग्य, महत्त्वाकांक्षा आणि समाधान यांच्यातील संघर्ष या नाटकातून अत्यंत प्रभावीपणे उभा राहतो. जग जिंकणारा अलेक्झांडर आणि स्वतःला जिंकणारा डायोजिनीस यांच्यातील वैचारिक द्वंद्व प्रेक्षकांच्या मनात नाटक संपल्यानंतरही दीर्घकाळ घुमत राहतं.

या विचारप्रवर्तक नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉ. सोमनाथ सोनवलकर सर यांचे विशेष कौतुक करावे लागेल. इतिहासातील एका प्रसंगाला केवळ माहितीच्या चौकटीत न ठेवता त्यांनी त्याला तत्त्वज्ञान, नाट्यमयता आणि मानवी संघर्ष यांची खोली दिली आहे. त्यांची लेखणी प्रश्न निर्माण करते आणि त्यांचे दिग्दर्शन त्या प्रश्नांना रंगमंचावर जिवंत करते.

अरुण राधायन सर यांनी साकारलेला डायोजिनीस हा केवळ एक पात्र राहत नाही; तो एक विचार बनून समोर उभा राहतो. त्यांच्या अभिनयातील शांतता, स्थिरता आणि संवादफेकीतील आत्मविश्वास प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतो.

विनय कांबळे यांनी साकारलेला क्रिटस हा नाटकातील महत्त्वाचा दुवा ठरतो. त्यांच्या अभिनयामुळे पात्राचा अंतर्गत संघर्ष आणि त्याची वैचारिक वाटचाल अत्यंत परिणामकारकरित्या उलगडते.

तसेच सैनिकाच्या भूमिकेत ग्रेगरी फर्नांडिस यांनी आपल्या उपस्थितीने आणि सहज अभिनयाने रंगमंचावरील वास्तवता अधिक बळकट केली आहे.

नाटकाच्या दृश्यभाषेला आकार देण्यात श्याम चव्हाण दादा यांच्या प्रकाशयोजनेचा सिंहाचा वाटा आहे. प्रकाशाचा वापर केवळ दृश्य उजळण्यासाठी नसून विचारांच्या छटा अधोरेखित करण्यासाठी कसा करता येतो, याचे उत्कृष्ट उदाहरण या नाटकात पाहायला मिळते.

महेंद्र मांजरेकर सर यांचे संगीत नाटकाच्या भावविश्वाला अधिक गहिरे बनवते. प्रसंगांचा भावार्थ अधोरेखित करताना संगीत कधीही पुढे येत नाही, तर नाटकाच्या आत्म्यात मिसळून जाते.

वेशभूषा आणि नेपथ्य विभागानेही ऐतिहासिक वातावरणाची निर्मिती अत्यंत अभ्यासपूर्ण आणि परिणामकारक पद्धतीने केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जाण्याचे काम सहज घडते.

एक प्रेक्षक, रंगकर्मी आणि नाटकप्रेमी म्हणून माझी मनापासून इच्छा आहे की अधिकाधिक लोकांनी हे नाटक अनुभवावे. कारण हे नाटक फक्त अलेक्झांडर आणि डायोजिनीस यांची कथा सांगत नाही; ते प्रत्येकाला एक प्रश्न विचारते — “खरंच जिंकणारा कोण?”

जर तुम्हाला विचार करायला लावणारे, मनाला हादरा देणारे आणि रंगभूमीची खरी ताकद दाखवणारे नाटक पाहायचे असेल, तर “Alexander via Diogenes हे नाटक नक्की पाहा. कदाचित नाटक संपेल, पण त्यातून सुरू झालेला विचारांचा प्रवास बराच काळ संपणार नाही.

Aryan

Natak khup chan ahe

3 months ago

Alexander via Diogeneses natak khup chan ahe. Savvad abhinay khup sunder nakki paynyasarkhe natak.

Sager

Natak khup sundar ahe

3 months ago

Alexander via Diogeneses हे नाटक खूप सुंदर आहे. ऐतिहासिक आणि विचार प्रवर्तक नाटक आहे.

Archana

मनात युद्ध पेटवणारं नाटक...

3 months ago

आजच्या काळात यश, सत्ता आणि स्वातंत्र्य यांचा अर्थ नव्याने समजून घ्यायचा असेल तर हे नाटक पाहायलाच हवं.नाटक पाहताना अनेकदा वाटलं की हा संघर्ष अलेक्झांडर आणि डायोजेनिसचा नसून आपल्या प्रत्येकाच्या मनात चालणारा संघर्ष आहे. अतिशय प्रभावी प्रयोग…

Prathamesh

अतिशय सुंदर आणि आशयपूर्ण नाटक

3 months ago

“Alexander via Diogenes” हे एक अतिशय सुंदर, विचार करायला लावणारं आणि प्रभावी नाटक आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला असून सर्वांची अभिनयकला अप्रतिम होती. संवाद, दिग्दर्शन, सादरीकरण आणि रंगमंचावरील ऊर्जा यामुळे नाटक शेवटपर्यंत खिळवून ठेवते. प्रत्येकाने आपली कामगिरी अत्यंत सुंदर रीतीने पार पाडली. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. असे दर्जेदार नाटक प्रत्येकाने एकदा तरी नक्की पाहावे

Aishwarya shinde

No Title

3 months ago

Alexander via Diogenes हे नाटक पाहिलं… आणि खरंच मनाला खूप स्पर्शून गेलं.

नाटक बघताना माझ्या डोक्यात चाललेला गोंधळ हळूहळू शांत झाला. Alexander सारखी सत्ता आणि यश असूनही समाधान नसणं, आणि Diogenes सारखं साधं पण पूर्ण स्वातंत्र्याचं आयुष्य जगणं या दोन्ही गोष्टी मनाला खूप खोलवर जाणवत आहेत

हे नाटक फक्त गोष्ट नाही, तर आपल्याला स्वतःकडे पाहायला लावणारं आरसा आहे. खरंच, आपण नेमकं काय शोधतोय आयुष्यात — सत्ता, पैसा, की मन:शांती?

संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन. असं विचार करायला लावणारं नाटक अनुभवायला मिळालं, यासाठी धन्यवाद सर 🙏

Mamata

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

Alexander via Diogenes मराठी नाटक • Marathi Natak Info

— जाहिरात —

Mastodon