Chhupe Rustam Marathi Natak
Chhupe Rustam Marathi Natak
प्रवेश व दिशा निर्मित

छुपे रुस्तम

लेखक: तेजस रानडे  •  दिग्दर्शक: विजय केंकरे

Synopsis

शंभर टक्के खरं कधीच कोणी बोलत नसतं. प्रत्येकजण काही ना काही लपवाछपवी करत असतो. ही लपवाछपवी जर नवरा बायको मधली असेल तर मग सगळा मामला कठीण होऊन बसतो. नवरा बायकोच्या नात्यातील लपवाछपवीचा हा खेळ आणि त्यातून उडणारी तारांबळ, तारेवरची कसरत, झालेली गोची याची सगळी धमाल म्हणजे ‘छुपे रुस्तम’ हे नाटक! ‘द लाय’ या फ्रेंच नाटकावर हे नाटक बेतलं आहे. ऋषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव हे दोन्ही हरहुन्नरी अभिनेते आगामी ‘छुपे रुस्तम’ या नाटकासाठी एकत्र आले आहेत. या दोघांसोबत मयुरा रानडे आणि कृष्णा राजशेखर या नाटकात काम करतायेत. विनोदाचा डोस देत नवरा बायकोच्या नात्यातील अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न ‘छुपे रुस्तम’ हे नाटक करतं. फार्स, गंमत, गॅासिप लपवाछपवी अशा सगळ्या गोष्टींनी हे नाटक रंगत जात. खास विजय केंकरे टच असलेल्या या नाटकात काम करणे ही आमच्यासाठी पर्वणी असल्याचे हे दोघे सांगतात.

Cast

ह्रषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव, मयुरा रानडे, कृष्णा राजशेखर

Crew

  • नेपथ्य: संदेश बेंद्रे
  • प्रकाश: शीतल तळपदे
  • संगीत: अजित परब
  • वेशभूषा:
  • निर्माते:
  • सूत्रधार:
  • इतर सदस्य:

User Reviews

There are no reviews yet. Be the first one to write one.

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

छुपे रुस्तम मराठी नाटक • Marathi Natak Info

— जाहिरात —

Mastodon