gela madhav kunikade marathi natak info
gela madhav kunikade marathi natak info
गौरी थिएटर्स निर्मित, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशीत

गेला माधव कुणीकडे

लेखक: वसंत सबनीस  •  दिग्दर्शक: राजीव शिंदे
0

Synopsis

वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाची संहिताच धमाकेदार होती. दोन कलावंत आपापल्या भूमिका घेऊन अभिनयाची जी जुगलबंदी पेश करायचे त्याला तोड नाही. दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल रसिकांना हास्याची मेजवानी देणारी असायची. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘अरे हाय काय अन् नाय काय’ असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. या दोघांच्या अफलातून टायमिंगवर पब्लिक फुल टू फिदा झालं. या नाटकातील प्रशांत दामले यांचा ‘अरे हाय काय अन् नाय काय’ हा डायलॉग आजही चांगलाच पॉपुलर आहे. सलग एक तपाहून अधिक काळ या नाटकाची लोकप्रियता वाढतच गेली.

Cast

विनय येडेकर, नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक, आणि प्रशांत दामले

Crew

  • नेपथ्य: राजीव शिंदे
  • प्रकाश: किशोर इंगळे
  • संगीत: राजीव शिंदे
  • वेशभूषा:
  • निर्माते:
  • सूत्रधार: अजय कासुर्डे
  • इतर सदस्य:

User Reviews
0
0 out of 5 stars (based on 0 reviews)
Excellent
Very good
Average
Poor
Terrible

There are no reviews yet. Be the first one to write one.

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

गेला माधव कुणीकडे मराठी नाटक • Marathi Natak Info


Mastodon