Mental health आणि childhood trauma हे दोन्ही विषय नाटक सिनेमा साठी नवीन नाहीत.
‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ याचा मूळ विषय हाच आहे.
पण खूप वेगळ्या पार्श्वभूमीवर आणि वेगळ्या नाते संबंधात हा विषय किंवा त्याचा गुंता आपल्यासमोर सुटत जातो. अनेकदा आई-मुलगी/मुलगा, नवरा-बायको, प्रेमी युगुल या नात्यांमधून mental health चा विषय मांडला जातो; पण इथे एक psychiatrist आणि त्याचा एक पेशंट या नात्यातून मनाचा झालेला गोंधळ/आजार उलगडत जातो.
लेखन संहिता खूप चांगली आहे. लेखकाने ६ वर्ष या विषयावर काम केले आहे, असे कळले. आणि लेखकाच्या, दिग्दर्शकाच्या आणि कलावंतांच्या एकत्रित विचारातून, चर्चेतून नाटकाचा विषय, प्रसंग दृश्यमय होत गेले. मी या सर्व लोकांचा एक पॉडकास्ट ऐकला होता. सतीश राजवाडेची मी फॅन आहेच. नाटकाचं नाव नवीन, थोडं विचित्र वाटलं म्हणून लगेच book my show वर पाहिलं. आणि आश्चर्य म्हणजे जिथे कधीच पुढची तिकिटे रिकामी दिसत नाहीत म्हणून थिएटर वर जाऊन काढावी लागतात, त्या बुकिंग ऍप वर चक्क दुसऱ्या रांगेतील जागा दिसत होती, म्हणून मी लगेच ती पकडली.
असो.
नाटकाचा लेखक सुदीप मोडक हा महत्वाच्या भूमिकेतही आहे. मला कधीकधी त्याचं काम (अभिनय) थोडं over वाटलं. पण कदाचित तो मुलगा (ते पात्र) ज्या background मधून आला आहे त्यामुळे तो तसाच असू शकतो, असाही विचार आला.
सगळ्यात भावला तो सतीश राजवाडे आणि त्याचं पात्रही. अभिनेता म्हणून त्याचा आवाज, त्यातील चढउतार, स्टेजवरचा सहज आणि ठाम वावर भारीच. (Perfect murder बघून खूप वर्ष झाली.) त्याने साकार केलेल्या पात्राचे विचार, समाजाविषयीची जाणीव हेही आवडलं. अशी माणसं समाजात असतात.. आणि म्हणून त्याचा तोल सावरलेला राहतो.
नाटकाचे नेपथ्यही उल्लेखनीय.
थोडक्यात काय, तर नाटक बघा आणि बघाच.
पण हो, प्रेक्षकांत ज्येष्ठ लोक अधिक होते. तरूण पिढीपर्यंत पोचायला हवं.
माधवी