shankar jaykishan Marathi natak
shankar jaykishan Marathi natak
भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित

शंकर जयकिशन

लेखक: विराजस कुलकर्णी  •  दिग्दर्शक: सुरज पारसनीस
4.7

Synopsis

In this entertaining story of friendship and fatherhood, Isha is trying to convince her grumpy, irritable, and reclusive father, Mahadev, to come live with her, when a mysterious stranger, Shyamsundar, enters their lives claiming to be Mahadev’s ‘BFF’- best friend forever! Is he lying? Does he have a secret? Why has he entered their lives after all these years? This funny, quirky, but emotional play brings together two stalwarts of Marathi theatre – Bharat Jadhav and Mahesh Manjarekar – together for the first time in history!

Cast

भरत जाधव, शिवानी रांगोळे, महेश मांजरेकर

Crew

  • नेपथ्य: संदेश बेंद्रे
  • प्रकाश: श्याम चव्हाण
  • संगीत: अजित परब
  • वेशभूषा:
  • निर्माते:
  • सूत्रधार:
  • इतर सदस्य: गीत: क्षितिज पटवर्धन

User Reviews
4.7
4.7 out of 5 stars (based on 3 reviews)
Excellent
Very good
Average
Poor
Terrible

सुंदर कलाकृती

1 day ago

नाटक संपल्यानंतरही त्यातील प्रसंग आणि संवाद बराच वेळ मनात रेंगाळत राहिले. उत्कृष्ट लेखन, प्रभावी सादरीकरण आणि कलाकारांचा जिवंत अभिनय यामुळे हा अनुभव खरोखरच संस्मरणीय ठरला. मनोरंजन करताना जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला लावण्याची ताकद या नाटकात आहे. प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घेतला. अशा सुंदर कलाकृतीसाठी संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार.

Shruti

मनोरंजनासोबतच एक सुंदर संदेश देणारा हा नाट्यप्रयोग

1 day ago

खूप दिवसांनी इतका सुंदर आणि दर्जेदार नाट्यप्रयोग पाहायला मिळाला. “शंकर जयकिसन” हे नाटक सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे आहे. कथानक, संवाद, संगीत आणि कलाकारांचा अभिनय अतिशय उत्कृष्ट आहे. नाटक हलक्याफुलक्या शैलीत महत्त्वाच्या विषयांवर विचार करायला भाग पाडते. महेश मांजरेकर सर, भरत जाधव सर आणि शिवानी रांगोळे यांनी आपली भूमिका मनापासून साकारली आहे. मनोरंजनासोबतच एक सुंदर संदेश देणारा हा नाट्यप्रयोग नक्कीच पाहावा असा आहे. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.

सौ. शोभा बागल

Shobha

बऱ्याच दिवसांनी एक खरोखर दर्जेदार नाट्यप्रयोग पाहायला मिळाला

1 month ago

दिनांक २/५/२०२६

बऱ्याच दिवसांनी एक खरोखर दर्जेदार नाट्यप्रयोग पाहायला मिळाला. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे सादर झालेला “शंकर जयकिसन” हा नाट्यप्रयोग अतिशय सुंदर, सहज आणि रोजच्या आयुष्यावर हसत खेळत भाष्य करणारा वाटला. अत्यंत नाजूक विषयांना कोणताही बोजडपणा न आणता हलकेच उलगडत त्यावर नकळत विचार करायला लावणे, हे या नाटकाने अप्रतिम साधले आहे.

भरत जाधव आणि महेश मांजरेकर या दोघांचाही अभिनय एकमेकांना पूरक आणि कथेला पूर्ण न्याय देणारा वाटला. संवाद, टायमिंग, भावभावना आणि रंगमंचावरील उपस्थिती यामुळे प्रत्येक प्रसंग जिवंत झाला. आपण सादर केलेला हा प्रयोग खरोखरच एक उत्कृष्ट कलाकृती आहे. मनोरंजन तर आहेच, पण त्याही पलीकडे साठीतल्या पिढीचा दाबलेला आवाज, त्यांच्या भावना, त्यांची एकटेपणाची जाणीव आणि बदलत्या काळातील त्यांची घुसमट अत्यंत प्रभावीपणे मांडली गेली आहे.

प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांमध्ये बसून नाट्यप्रयोग पाहण्याची एक वेगळीच गंमत असते. प्रत्येक संवादानंतर पालकांच्या मुलांकडे वळलेल्या नजरा, नकळत उमटणारे हुंकार, चेहऱ्यावरचे भाव आणि देहबोली पाहताना असे वाटत होते की रंगमंचावर फक्त नाटक नाही, तर अनेकांच्या मनात दडलेले आयुष्यच उभे राहिले आहे.

अशा अप्रतिम अनुभवासाठी सर तुमचे, संपूर्ण नाटकाच्या टीमचे आणि सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

श्री. हेमंत कोळंबकर

लेखक

हेमंत

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

शंकर जयकिशन मराठी नाटक • Marathi Natak Info

Shankar Jaykishan, also spelled as Shankar Jaikishan is a new Marathi natak in 2025 written by Virajas Kulkarni and directed by Suraj Parasnis. Produced by Bharat Jadhav Entertainment, the play brings stalwarts Bharat Jadhav & Mahesh Manjrekar together on stage, along with actress Shivani Rangole. Shankar Jaikishan Marathi Natak is a hilarious emotional roller-coaster that’s sure to be enjoyed by everyone.

Don’t miss Shankar Jaykishan at a theatre near you and get to know everything you need to know about this play on रंगभूमी.com.


Mastodon