गौरी थिएटर्स निर्मित, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशीत
गेला माधव कुणीकडे
कलाकार आणि तंत्रज्ञ
- कलाकार
- विनय येडेकर, नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक, आणि प्रशांत दामले
- लेखक
- वसंत सबनीस
- दिग्दर्शक
- राजीव शिंदे
- निर्माता
- संगीत
- राजीव शिंदे
- नेपथ्य
- राजीव शिंदे
- प्रकाशयोजना
- किशोर इंगळे
- सूत्रधार
- अजय कासुर्डे
गेला माधव कुणीकडे नाटकाबद्दल
वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाची संहिताच धमाकेदार होती. दोन कलावंत आपापल्या भूमिका घेऊन अभिनयाची जी जुगलबंदी पेश करायचे त्याला तोड नाही. दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल रसिकांना हास्याची मेजवानी देणारी असायची. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
‘अरे हाय काय अन् नाय काय’ असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. या दोघांच्या अफलातून टायमिंगवर पब्लिक फुल टू फिदा झालं. या नाटकातील प्रशांत दामले यांचा ‘अरे हाय काय अन् नाय काय’ हा डायलॉग आजही चांगलाच पॉपुलर आहे. सलग एक तपाहून अधिक काळ या नाटकाची लोकप्रियता वाढतच गेली.
पाहिलंत का हे नाटक?
Share your experience — reviews live on the natak page.