पवित्र आषाढी एकादशीच्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात ‘कलासक्त मुंबई’ या नामांकित नाट्यसंस्थेने आपल्या आगामी विशेष नाट्यप्रयोगाची अधिकृत घोषणा केली आहे. ‘मुक्ताई‘ असे नाव असलेला हा एकलनाट्य दीर्घांक (Mono-act play) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
गेली अनेक वर्षे एकांकिका आणि राज्यनाट्य स्पर्धांच्या माध्यमातून सातत्याने दर्जेदार व प्रयोगशील नाटकांची निर्मिती करणाऱ्या ‘कलासक्त मुंबई‘ संस्थेने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके व बक्षिसे पटकावली आहेत. याच परंपरेला पुढे नेणारा हा एक नवा आणि आगळावेगळा प्रयोग असणार आहे.
७५० वर्षांची भक्तीची आणि विचारांची परंपरा
ज्ञानेश्वर माऊलींच्या धाकट्या भगिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत मुक्ताबाई या केवळ माऊलींच्या प्रेरणास्थान नव्हत्या, तर त्या आपल्या काळाच्या पुढचा विचार मांडणाऱ्या थोर संत आणि महान कवयित्री होत्या. आध्यात्मिक इतिहास, संस्कृती, विचारांचा वारसा आणि महाराष्ट्राची ७५० वर्षांची भक्तीची संत परंपरा या नाटकातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. संत मुक्ताबाईंचा हाच प्रेरणादायी जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या दीर्घांकाद्वारे केला जाणार आहे.
तिकीट विक्री सुरू
पहिल्या प्रयोगाचे वेळापत्रक
दिनांक: ०२ ऑगस्ट २०२६
वेळ: दुपारी ०४:३० वाजता
ठिकाण: लघु नाट्यगृह, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई
नाटकाविषयी व टीमची माहिती
- नाटकाचे नाव: मुक्ताई (एकलनाट्य दीर्घांक)
- सादरकर्ती (अभिनेत्री): डॉ. यशश्री कंटक
- लेखक: दिग्पाल लांजेकर
- दिग्दर्शक: योगेश कदम
- नेपथ्य: प्रदीप पाटील
- पार्श्वसंगीत: अक्षय धांगट
- प्रकाशयोजना: श्याम चव्हाण
- रंगभूषा: उलेश खंदारे
- कालावधी: ७५ मिनट (सलग)
- प्रस्तुती: कलासक्त मुंबई
- टिकेटिंग व मीडिया पार्टनर: मायरंगभूमी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने झालेल्या या घोषणेमुळे नाट्यप्रेमी आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांचा आदर करणाऱ्या प्रेक्षकांमध्ये या नाटकाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

1 Comment
Waiting for this one