kalasakta mumbai muktaani marathi natak cover0

कलासक्त मुंबई सादर करीत आहोत

मुक्ताई

लेखक: दिग्पाल लांजेकर • दिग्दर्शक: योगेश कदम

मुक्ताई

ज्ञानेश्वर माऊलींच्या धाकट्या भगिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत मुक्ताबाई या केवळ माऊलींच्या प्रेरणास्थान नव्हत्या, तर त्या आपल्या काळाच्या पुढचा विचार मांडणाऱ्या थोर संत आणि महान कवयित्री होत्या. संत मुक्ताबाईंचा हाच प्रेरणादायी जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या दीर्घांकाद्वारे केला जाणार आहे. आध्यात्मिक इतिहास, संस्कृती, विचारांचा वारसा आणि महाराष्ट्राची ७५० वर्षांची भक्तीची संत परंपरा या नाटकातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे.ज्ञानेश्वर माऊलींच्या धाकट्या भगिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत मुक्ताबाई या केवळ माऊलींच्या प्रेरणास्थान नव्हत्या, तर त्या आपल्या काळाच्या पुढचा विचार मांडणाऱ्या थोर संत आणि महान कवयित्री होत्या. संत मुक्ताबाईंचा हाच प्रेरणादायी जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या दीर्घांकाद्वारे केला जाणार आहे. आध्यात्मिक इतिहास, संस्कृती, विचारांचा वारसा आणि महाराष्ट्राची ७५० वर्षांची भक्तीची संत परंपरा या नाटकातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे.

  • नाटकाचे नाव: मुक्ताई (एकलनाट्य दीर्घांक)
  • सादरकर्ती (अभिनेत्री): डॉ. यशश्री कंटक
  • लेखक: दिग्पाल लांजेकर
  • दिग्दर्शक: योगेश कदम
  • नेपथ्य: प्रदीप पाटील
  • पार्श्वसंगीत: अक्षय धांगट
  • प्रकाशयोजना: श्याम चव्हाण
  • रंगभूषा: उलेश खंदारे
  • कालावधी: ७५ मिनट (सलग)
  • प्रस्तुती: कलासक्त मुंबई
  • टिकेटिंग व मीडिया पार्टनरमायरंगभूमी